Premium|RainMumbai Weather Derivatives : ये रे, ये रे पावसा... तुझ्याकडून घेतो पैसा!

India Weather Risk Management : मुंबईतील पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी एनसीडीईएक्सने ‘RAINMUMBAI’ वेदर डेरिव्हेटिव्हज करार सुरू केला असून, हवामानाला आता व्यापारयोग्य आर्थिक मालमत्तेचे स्वरूप मिळत आहे.
RainMumbai Weather Derivatives

RainMumbai Weather Derivatives

esakal

Updated on

गौरव बोरा - gauravbora89@gmail.com

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या मॉन्सूनवर देशातील अनेक उद्योग, शेती, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्र अवलंबून आहे. दरवर्षी पावसातील अनिश्चितता शेतकरी, बांधकाम क्षेत्र, वीजनिर्मिती कंपन्या आणि बँकांसाठी मोठे आर्थिक आव्हान निर्माण करते. अशा परिस्थितीत भारताने हवामानाशी संबंधित जोखीम व्यवस्थापनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजने (एनसीडीईएक्स) देशातील पहिला सेबी-मान्यताप्राप्त एक्स्चेंज-ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्हज करार ‘RAINMUMBAI’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजने (एनसीडीईएक्स) देशातील पहिला सेबी-मान्यताप्राप्त एक्स्चेंज-ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्हज करार ‘RAINMUMBAI’ या नावाने एक जून २०२६ पासून सुरू केला आहे. हा करार भारतातील हवामान-आधारित आर्थिक योजनांची नव्या युगाची सुरुवात मानला जात आहे. विशेष म्हणजे, हा करार भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अधिकृत पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर आधारित असून, त्याची रचना आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com