

Rare Earth Metals Geopolitics
esakal
सध्या जगभरात विविध उद्योगांना लागणाऱ्या रेअर अर्थ मेटल अर्थात दुर्मीळ धातूंच्या टंचाईमुळे खळबळ माजली आहे. या विषयावर फ्रेंच पत्रकार, माहितीपट निर्माते आणि लेखक गुइलमे पिट्रोन यांनी डझनभर देशांमधून माहिती गोळा करून सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर ‘द रेअर मेटल्स वॉर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या या पुस्तकावर आधारित धनंजयराव आणि छोटू यांच्यात रंगलेला हा संवाद...
सी रत्ने मेळवीन’ काय जबरदस्त पुस्तक आहे राव, नारायण धारपांचे!!’’ छोटू प्रभावित होऊन म्हणाला.
‘‘एक वेडा संशोधक सगळ्या अति हुशार मुलांना पळवून त्यांचा वापर करणार असतो, तेवढ्यात आपला नायक येऊन त्याला हरवतो, तेच ना हे पुस्तक?’’ धनंजयराव सहसा एकदा वाचलेले विसरत नसत.