Foreign Exchange Reserves Get Major Boost
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशातून विदेशी चलन भारतात आणण्यासाठी सुरू केलेल्या योजनांला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ जुलै २०२६ पर्यंत या योजनांच्या माध्यमातून भारतात तब्बल ४०.८१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३.५ लाख कोटी रुपये इतकी विदेशी चलन भारतात आली आहे. त्यामुळे देशाचा परकीय चलनसाठा आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.