Premium| RBI Retail Direct : सरकारी रोख्यांमध्ये थेट गुंतवणुकीचा मार्ग

Government securities investment : ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’मुळे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे हे सामान्यांसाठी अधिक सोपं झालं आहे.
RBI Retail Direct

RBI Retail Direct

E sakal

Updated on

How to Invest in G-Secs, SDLs, T-Bills, and Sovereign Gold Bonds via RBI Retail Direct

लक्ष्मीकांत श्रोत्री, अनुभवी गुंतवणूक सल्लागार

lshrotri@hotmail.com

एक काळ असा होता, जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार सरकारी रोख्यांमध्ये स्वतः गुंतवणूक करू शकत नव्हते. त्यांना फक्त म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करता येत होती. त्यामुळे शाश्वत परतावा आणि सर्वांत सुरक्षित गुंतवणुकीच्या या पर्यायापासून सर्वसामान्य गुंतवणूकदार वंचित होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ योजना सुरू केली आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या पर्यायात गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला केला. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये ‘आरबीआय’ने मोबाइल अॅप सुरू केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता थेट सरकारी रोखे (गव्हर्न्मेंट सिक्युरिटी- जी-सेक), राज्य विकास कर्जे (स्टेट डेव्हलपमेंट लोन- SDLs) आणि ट्रेझरी बिल (T-Bills) यांमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि तीही कोणत्याही मध्यस्थाविना.

‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’मुळे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे हे सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ झाले आहे. ऑनलाइन सुविधा, पारदर्शक प्रक्रिया आणि सरकारची हमी यामुळे हे एक सुरक्षित आणि विश्वसनीय असे गुंतवणुकीचे साधन ठरते; मात्र व्याजदरातील चढ-उतार आणि तरलतेच्या मर्यादा लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com