

Sovereign Gold Bond Delivers Massive Returns: Money Triples in 5 Years
eSakal
Sovereign Gold Bond Redemption : गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जाणारा सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) पुन्हा एकदा फायद्याचा ठरला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने SGB 2020-21 सिरीज-IV साठी मुदतपूर्व परताव्याची घोषणा केली असून, या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. अवघ्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 190 टक्क्यांची वाढ झाली आहे.