

मुंबई : अनेकदा कर्जदारांकडून कर्जवसुली करण्यासाठी बँका, वित्तीय संस्थाकडून गैरपद्धतींचा वापर केला जातो. अशा सक्तीच्या कर्जवसुली पद्धतींविरुद्ध रिझर्व्ह बँकेने कठोर भूमिका घेतली असून, कर्जदारांचे संरक्षण करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ता. १ जानेवारी २०२७पासून ही नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत.