RBI new decision
Sakal
Year Ender : 2025 हे वर्ष भारतीय कुटुंबांच्या बजेटसाठी मोठा दिलासा घेऊन आले आहे. महागाई, वाढते खर्च आणि जड EMI यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतलेल्या अनेक निर्णयांचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला आहे. संपूर्ण वर्षभर करण्यात आलेल्या रेपो रेट कपातींमुळे कर्ज बाजाराचा कल बदलला आणि दरमहा भराव्या लागणाऱ्या EMI मध्ये लक्षणीय घट पाहायला मिळाली.