

RBI new deposit rules from October 1
sakal
RBI latest rules for banks and customers: बँकिंग क्षेत्रात मोठ्या ठेवी मिळवण्यासाठी ठरावीक बड्या ठेवीदारांना नियमापेक्षा जादा व्याजदर देण्याच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापुढे ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना कोणताही भेदभाव करता येणार नसून, सर्व शाखांमध्ये सर्व ग्राहकांना समान व्याजदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. एक ऑक्टोबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात बंधनकारक असेल.