Jan Dhan Account
ESakal
Sakal Money
Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...
Jan Dhan Account Facilities: भारतीय रिझर्व्ह बँकेने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ही खाती आता इतर बचत खात्यांसारखीच वैशिष्ट्ये देतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांचे अपग्रेड करण्याचा प्रस्ताव जाहीर केला. ज्यामध्ये इतर बचत खात्यांप्रमाणेच सर्व वैशिष्ट्ये मोफत असतील. या सुधारणांचा उद्देश ग्राहक-केंद्रित अनुभव प्रदान करणे, प्रवेश वाढवणे आणि खातेधारकांसाठी, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या आणि ग्रामीण ग्राहकांना सुरक्षितता मजबूत करणे आहे.