

मुंबई : अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय निर्यातदार अडचणीत आले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अनेक व्यापार सवलती जाहीर केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने ‘फेमा’ नियम शिथिल केले असून, कर्जपरतफेडीसाठी कालावधी वाढवून देण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्यामुळे निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे नवे नियम तत्काळ लागू करण्यात आले आहेत.