

RBI E-cheques Proposal
ESakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ मार्च २०२६ रोजी आपला "पेमेंट्स व्हिजन २०२८" हा दस्तऐवज प्रसिद्ध केला. यामध्ये पारंपरिक कागदी चेकच्या जागी ई-चेक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. डिजिटल पेमेंट अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित करणे हा यामागील उद्देश आहे. कागदी धनादेशांचे फायदे आणि डिजिटल पेमेंटचा वेग व विश्वासार्हता यांचा मेळ घालण्यासाठी ई-चेक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.