

Bank Provide Acquisition Financing
ESakal
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, मध्यवर्ती बँक सावधगिरीने काम करत आहे. परंतु अलीकडेच धाडस दाखवण्याची गरज असल्याने बँकांच्या कामकाजाचे नियम शिथिल केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, बँकांवरील वाढलेली जबाबदारी त्यांच्या सुधारित कामगिरी आणि चांगल्या कार्यप्रणालीमुळे आहे. कोणत्याही गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे पुरेशी साधने आहेत.