

SEBI Registered Investment Advisor
esakal
अलीकडच्या काळात शेअर बाजार, म्युच्युअल फंड यांत गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. आर्थिक नियोजनाबाबतही लोक जागरुक होत आहेत. मात्र, त्या तुलनेत आर्थिक सल्ला देणाऱ्या प्रशिक्षित, तज्ज्ञांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरसाठी मोठी संधी आहे. ही संधी साधण्यासाठी काही मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध असून, भांडवल बाजार नियामक ‘सेबी’च्या परवान्याची गरज असते. याची पूर्तता केल्यानंतर ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करता येते आणि चांगली कमाई करण्यासह अनेकांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी हातभार लावून समाधान, आनंदही मिळवता येतो. अशा या करिअरबाबत माहिती देणारा हा दिलखुलास संवाद...
लो नयनाताई, काय म्हणताय? संपली का लग्नाची गडबड? आणि हो, नव्या सूनबाई काय म्हणतायत?’’ नयनाताई या माझ्या काहीशा ज्येष्ठ मैत्रीण. नुकतंच त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं; पण मी काही कामानिमित्त परगावी असल्याने लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते.
‘‘हो, गडबड वगैरे तर संपली आता. मनीषा म्हणजे सूनबाई काय, मजेतच आहे. पण तिचं तंत्र काही वेगळंच आहे बाई. ती घरात असते पण आणि नसते पण.’’
‘‘म्हणजे हो काय? मी नाही समजले.’’