

Stock market today
Sakal
Share Market Closing Today : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरण निर्णयापूर्वीच्या आशावादी वातावरणामुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी वाढीसह बंद झाला. अहवालांनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लवकरच भारताबरोबर व्यापार कराराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या वृत्तामुळेही बाजारात आज गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला.