

History and Evolution of Sharda Motor Industries
Sakal
भूषण ओक (शेअर बाजार अभ्यासक- विश्लेषक)
भारतात स्वातंत्र्यानंतर वाहनउद्योगाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला तो १९८१ मध्ये मारुती उद्योग ही कंपनी स्थापन झाल्यानंतर. तिने १९८३ मध्ये ‘मारुती ८००’ ही मोटार आणल्यानंतर अनेक वाहन कंपन्या आणि त्यांच्यासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांची एक मोठी मूल्यसाखळी प्रस्थापित झाली. मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय अर्थव्यवस्थेवर, मागणीवर आणि स्पर्धेवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो, तर सुट्या भागांच्या कंपन्यांना अनेक ग्राहक असल्याने त्यांचा व्यवसाय थोडा सुरक्षित असतो. त्याबरोबरच मुख्य क्षेत्रातील मागणी कमी-जास्त झाल्याचे आगाऊ संकेत या कंपन्यांच्या व्यवसायावरून मिळतात.