
गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात सातत्याने सुरू असलेल्या घसरणीला मागच्या आठवड्यापासून ब्रेक लागला. गेल्या आठवड्यातली तेजी आजही कायम राहिली. एक टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह निफ्टि २३ हजार ७०० अंकावर पोहोचला. अनेक सेक्टरमध्ये खरेदी झाली तर ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनांमध्ये नरमाईच्या अपेक्षेने बाजारात सकारात्मक वातावरण होतं. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टि इंडेक्स जवळपास दीड महिन्यानंतर पहिल्यांदा ७८ हजार आणि २३७०० च्या वर गेले.