
Share Market: शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची सपाट सुरुवात झाली. ५० अंकांनी सेन्सेक्स वधारला तर निफ्टीही ३१.८५ अंकांनी वाढला. सेन्सेक्स ७९,९२९ अंकांवर आहे तर निफ्टी २४,३९५.१५ अंकांवर आहे. प्री ओपनिंगमध्ये बाजारात वाढ दिसून आली. सेन्सेक्स १३४.२१ अंकांनी तर निफ्टी १५.८० अंकांनी वाढला. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजार कोसळला होता. ४ महिन्यांनी शेअर बाजार ८० हजारांच्या खाली आला होता. शुक्रवारी सेन्सेक्स ७६५ अंकांनी घसरून ७९,८५७ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टीही २४६ अंकांनी घसरून २४ हजार ३५० अंकांवर बंद झाला होता.