Adani Group: अदानी ग्रुपच्या कॉर्पोरेट प्रमुखांचा NDTVच्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा; कारण...

NDTV मधून संचालक पदाचा दुसरा राजीनामा
Gautam Adani
Gautam Adani Sakal

Adani Group: अमन कुमार सिंग हे कॉर्पोरेट ब्रँड गार्डियन आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे प्रमुखांनी NDTV लिमिटेडच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे.

नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) ने गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला सांगितले की, “अमन कुमार सिंग यांनी त्यांच्या वैयक्तिक व्यस्ततेमुळे कंपनीच्या गैर-कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.'' त्यांचा राजीनामा 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

सिंग हे माजी भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आणि छत्तीसगडमधील रमन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये अधिकारी होते, तेव्हा ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते. (Adani Group brand custodian Aman Kumar steps down from NDTV board)

त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि नोव्हेंबर 2022 मध्ये कॉर्पोरेट ब्रँड मेंटॉर आणि कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख म्हणून अदानी समूहात सामील झाले.

अदानी यांनी NDTV ताब्यात घेतल्यानंतर सिंह यांचा अदानी समूहाने NDTV च्या संचालक मंडळात समावेश झाला होता. छत्तीसगडच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) फेब्रुवारी 2022 मध्ये सिंग आणि त्यांची पत्नी यास्मिन सिंग यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Gautam Adani
CNG-PNG Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा! 'या' सात राज्यांमध्ये CNG-PNGच्या दरात मोठी घट

NDTV मधून संचालक पदाचा दुसरा राजीनामा :

उल्लेखनीय म्हणजे, NDTV मध्ये अदानी समूहाने नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याचा हा दुसरा राजीनामा आहे. यापूर्वी, कंपनीचे तत्कालीन अतिरिक्त गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक, सुनील कुमार यांनी 9 मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

असे एनडीटीव्हीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. सुनील कुमार हे 1979 च्या बॅचचे IAS-अधिकारी देखील होते. ते 2012 ते 2014 पर्यंत छत्तीसगडचे मुख्य सचिव होते.

Gautam Adani
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com