Adani Group : अदानी ग्रुपवर आणखी एक संकट! 7 हजार कोटींचा करार रद्द; काय आहे कारण?

अदानी समूहाबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे.
Adani Group
Adani GroupSakal

Adani Group News : अदानी समूहाबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. समूह कंपनी अदानी पॉवर आणि डीबी पॉवर यांच्यात आता व्यवहार होणार नाहीत.

प्रत्यक्षात मुदत वाढवूनही अदानी पॉवर डीबी ग्रुपचे अधिग्रहण करू शकली नाही. मुदत संपल्यानंतर अदानी पॉवरने ही घोषणा केली आहे. हा करार 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार होता.

अदानी समूहाच्या अडचणीत भर :

अदानी समूह आणि अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग यांच्यात वाद सुरू झाल्यापासून अदानी समूहाबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत आहेत. यातच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

दैनिक भास्कर समूहाची वीज कंपनी डीबी पॉवर आणि अदानी पॉवर यांच्यातील करार आता होणार नाही. अदानी पॉवरने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डीबी पॉवरच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती.

Adani Group
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाल्या, राज्य सरकार...

करार का तुटला :

अदानी पॉवरने डीबी पॉवर लिमिटेडची थर्मल पॉवर मालमत्ता 7,017 कोटी रुपयांना खरेदी करण्यासाठी करार केला होता. अदानी पॉवर आणि डीबी पॉवर यांनी प्रस्तावित करार पूर्ण करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवण्याचे मान्य केले होते.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

त्यानंतर पुन्हा तारीख वाढवण्यात आली. अदानी पॉवरने डील पूर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 निश्चित केली होती. यानंतर, ही तारीख पुन्हा एकदा वाढवून 15 जानेवारी 2023 करण्यात आली. असे असतानाही हा करार पूर्ण झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com