

.Jewellery Company IPO Creates Market Frenzy! Can Investors Earn 36% on Listing Day?
eSakal
Advit Jewels IPO: गेल्या एका वर्षापासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. यातच आता ज्वेलरी म्हणजेच दागिन्यांच्या व्यवसायातील Advit Jewels या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. IPO खुला झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तो 44 पटांहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. विशेष म्हणजे ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी असल्याने लिस्टिंगवेळी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.