Upcoming IPO: 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल

Bharti Hexacom IPO: भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) बोर्डाने त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉमच्या (Bharti Hexacom) आयपीओला मान्यता दिली आहे. कंपनीने नुकतीच नियामक फायलिंगमध्ये ही माहिती दिली. भारती हेक्साकॉमने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत.
Airtel board approves Bharti Hexacom IPO
Airtel board approves Bharti Hexacom IPOSakal
Updated on

Bharti Hexacom IPO: भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) बोर्डाने त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉमच्या (Bharti Hexacom) आयपीओला मान्यता दिली आहे. कंपनीने नुकतीच नियामक फायलिंगमध्ये ही माहिती दिली. भारती हेक्साकॉमने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत.

देशातील तीन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलची भारती हेक्साकॉममध्ये 70 टक्के भागीदारी आहे. त्याच वेळी, उर्वरित 30 टक्के हिस्सा भारत सरकारकडे आहे. सध्या हे शेअर्स 1127 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Airtel board approves Bharti Hexacom IPO
Gold Rate: अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले

भारती हेक्साकॉमच्या आयपीओअंतर्गत, 5 रुपये फेस वॅल्यूचे 10 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. एक्सचेंज फायलिंगनुसार, हे कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 20 टक्के आहे. ऑफरमध्ये नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीने 19 जानेवारीला टेलिकॉम कन्सल्टंट इंडिया लिमिटेडच्या प्रस्तावित आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे डीआरएचपी दाखल केल्याचे नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीने पुढे सांगितले की हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस आहे, त्यामुळे भारती हेक्साकॉमला आयपीओमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.

आयपीओअंतर्गत, भारत सरकार ओएफएसद्वारे भारती हेक्साकॉममधील 20% स्टेक विकणार आहे. ओएफएस अंतर्गत विकले जाणारे 10 कोटी शेअर्स सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी टेलिकॉम कंसल्टंट इंडिया लिमिटेडकडे आहेत. भारती ग्रुपचा शेवटचा आयपीओ भारती इन्फ्राटेलचा होता, जो आता इंडस टॉवर्स म्हणून ओळखला जातो. ही कंपनी 2012 मध्ये लिस्ट झाली होती.

Airtel board approves Bharti Hexacom IPO
Ram Mandir: रामलल्लाच्या आगमनासाठी जमली कुबेरांची मांदियाळी ! अंबानी-बिर्ला, मित्तल यांच्यासह उद्योगपतींची अयोध्येत उपस्थिती

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com