IPO News: कमाईची सुवर्णसंधी! अल्पेक्स सोलरचा आयपीओ 8 फेब्रुवारीला खुला होणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aplex Solar IPO Check Latest GMP, Price Band, Allotment Date And Other Details : सोलर सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अल्पेक्स सोलर लिमिटेडचा (Alpex Solar Ltd) आयपीओ 8 फेब्रुवारीला उघडेल आणि 12 फेब्रुवारीला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 7 फेब्रुवारीला बोली लावू शकतील.
Aplex Solar IPO Check Latest GMP, Price Band, Allotment Date And Other Details
Aplex Solar IPO Check Latest GMP, Price Band, Allotment Date And Other DetailsSakal
Updated on

Aplex Solar IPO: सोलर सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अल्पेक्स सोलर लिमिटेडचा (Alpex Solar Ltd) आयपीओ 8 फेब्रुवारीला उघडेल आणि 12 फेब्रुवारीला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 7 फेब्रुवारीला बोली लावू शकतील. 75 कोटीच्या या आयपीओसाठी 109-115 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.

अल्पेक्स सोलरने आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील 19.55 कोटी आपल्या सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग सुविधा अपग्रेड आणि विस्तार करण्यासाठी आणि तिची क्षमता 450 मेगावॅटवरून 1.2 गिगावॅटपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.

याव्यतिरिक्त, 12.94 कोटी सौर मॉड्यूल्सच्या ॲल्युमिनियम फ्रेमसाठी नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित 20.49 कोटी खेळत्या भांडवलाची गरज आणि इतर कॉर्पोरेट खर्च भागवण्यासाठी वापरले जातील.

Aplex Solar IPO Check Latest GMP, Price Band, Allotment Date And Other Details
Multibagger Stock: 4 वर्षात 1 लाखाचे झाले 58 लाख, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

अल्पेक्स सोलरच्या आयपीओची लॉट साइज 1200 इक्विटी शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 1 लाख 38 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी 18.45 लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

सुमारे 3.24 लाख इक्विटी शेअर्स मार्केट मेकर्सना, 9.24 लाख इक्विटी शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NIIs) वाटप करण्यात आले आहेत. तर 12.31 लाख इक्विटी शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) आणि 21.55 लाख इक्विटी शेअर्स रिटेलसाठी (RIIs) राखीव ठेवण्यात आले आहेत.

Aplex Solar IPO Check Latest GMP, Price Band, Allotment Date And Other Details
Repo Rate : रेपो दर ‘जैसे थे’ राहाण्याची शक्यता

अल्पेक्स सोलर आयपीओच्या शेअर्सचे वाटप 13 फेब्रुवारीला केले जाईल आणि शेअर्स 15 फेब्रुवारीला एनएसई एमर्जवर लिस्ट केले जातील. कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स हे अल्पेक्स सोलर आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com