

Pharma Stock: ऍस्ट्राझेनेका फार्मा इंडियाचे (Astrazeneca Pharma India) शेअर्स गुरुवारी सुमारे 6 टक्क्यांनी वाढले. सध्या हा शेअर 2.32 टक्क्यांनी वाढून 4720.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. ही फार्मा कंपनी लवकरच ब्रेस्ट कॅन्सरचे औषध बाजारात आणणार आहे.
जानेवारी 2024 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगावरील औषध Enhertu लाँच करणार असल्याचे कंपनीने सांगितले. या बातमीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 11,821.13 कोटी झाले आहे.
Enhertu हे अनटेक्टेबल किंवा मेटास्टॅटिक HER2-पॉझिटिव्ह स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी आहे. असे ऍस्ट्राझेनेका फार्मा इंडियाने (Astrazeneca Pharma India) एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.
या वर्षी मे महिन्यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून फॉर्म सीटी - 20 मध्ये आयात आणि मार्केटिंगची परवानगी टॅनस्टुजुमॅब डिरक्सटेक (Tanstuzumab Deruxtecan) 100 mg/5 mL Vial लियोफिलाइज्ड पावडर 2017 मध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मिळाली आहे.
ऍस्ट्राझेनेका फार्मा इंडियाने सप्टेंबरमध्ये 52.4 कोटीचा नफा कमावला, जो वार्षिक आधारावर 60.8 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 31.7 टक्क्यांनी वाढून 311 कोटीवर पोहोचला आहे.
2023 मध्ये आतापर्यंत स्टॉक सुमारे 40 टक्क्यांनी वाढला आहे. त्या तुलनेत, बेंचमार्क इक्विटी इंडेक्स निफ्टी 50 ने याच कालावधीत 15.5 टक्के वाढ नोंदवली आहे.
ऍस्ट्राझेनेका फार्मा इंडिया ही ऍस्ट्राझेनेका Plc, यूकेची लिस्टेड सब्सिडियरी अर्थात उपकंपनी आहे. ही कंपनी भारतातील उत्पादन, विक्री आणि मार्केटिंगमध्ये मदत करते.
ऍस्ट्राझेनेका ही तीच कंपनी आहे जिने ऑक्सफर्डसह विकसित केलेली लस भारतात कोव्हिशिल्ड (Covishield) म्हणून विकली आणि ती जगभरातील साथीच्या रोगाविरुद्ध वापरली गेली.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.