
थोडक्यात:
अॅक्सिस बँकेच्या निराशाजनक निकालांमुळे शेअर 7% घसरून 1,113 रुपयांवर आला.
ब्रोकरेज हाऊसेसनी EPS कमी करून शेअरचे टार्गेट 1,400 रुपयांवरून 1,180-1,280 रुपयांपर्यंत कमी केले.
गेल्या वर्षभरात शेअर 14% घसरला, पण मागील 3 वर्षांत शेअरने 66% परतावा दिला आहे.
Axis Bank Stock: आज शुक्रवारी (18 जुलै) देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 540 अंकांनी कोसळून व्यापार करत होता, तर निफ्टी 150 अंकांनी घसरून व्यवहार करत होता. यामध्ये सर्वाधिक दबाव बँकिंग क्षेत्रावर दिसून आला. लार्जकॅप स्टॉक्समध्ये अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.