

Eid-ul-Fitr 2025: ईद हा सण 31 मार्च म्हणजेच सोमवारी आहे. हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी अनेक सरकारी ते खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे, सोमवारीही अनेक बँका बंद राहणार आहेत.
मात्र, ईद असूनही सोमवारी अनेक बँका सुरू राहणार असून बँकिंग प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची कामे होणार आहेत. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सोमवारी बाजार उघडेल की बंद राहील हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.