

Big News for Investors: BCCL IPO Postponed, Check Latest GMP Updates
eSakal
BCCL IPO investor update: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) यांनी आपल्या IPO च्या लिस्टिंग तारखेत बदल केला आहे.
आधी हा शेअर शुक्रवार, 16 जानेवारीला शेअर बाजारात लिस्ट होणार होता. मात्र आता तो पुढे ढकलण्यात आला असून, सोमवार, 19 जानेवारी रोजी कंपनीचे शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.