IPO News : आज पासून खुला होणार बीकन ट्रस्टीशिप लिमिटेडचा आयपीओ

दिग्गज डिबेंचर ट्रस्टी बीकन ट्रस्टीशिप लिमिटेडचा (Beacon Trusteeship) आयपीओ 28 मेपासून खुला होणार आहे. या आयपीओतून 32.52 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
IPO News
IPO Newssakal

दिग्गज डिबेंचर ट्रस्टी बीकन ट्रस्टीशिप लिमिटेडचा (Beacon Trusteeship) आयपीओ 28 मेपासून खुला होणार आहे. या आयपीओतून 32.52 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. इश्यूसाठी प्राइस बँड 57-60 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे आणि लॉट साइज 2000 शेअर्स आहे. आयपीओमध्ये 30 मे पर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. तर अँकर गुंतवणूकदार 27 मे रोजी बोली लावू शकतील. एनएसई एसएमइवर 4 जूनला शेअर्सची लिस्टींग होऊ शकते. बीलाइन कॅपिटल ऍडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तर केफीन टेक्नोलॉजीज लिमिटेड आयपीओसाठीचे रजिस्ट्रार आहेत.

बीकन ट्रस्टीशिप आयपीओमध्ये 23.23 कोटीचे 38.72 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच 9.29 कोटीच्या 15.48 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. ओएफएसमध्ये शेअर्स विकणाऱ्यांमध्ये प्रसाना ऍनालिटीक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कौस्तुभ किरण कुलकर्णी यांचा समावेश आहे.

आयपीओच्या 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. 2015 मध्ये सुरू झालेली बीकन ट्रस्टीशिप डिबेंचर ट्रस्टी सर्व्हिसेस ही कंपनी सिक्युरिटी ट्रस्टी सर्व्हिसेस, ट्रस्टी टू अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड, ट्रस्टी टू ESOP, सिक्युरिटायझेशन ट्रस्टी, बाँड ट्रस्टीशिप सर्व्हिसेस, एस्क्रो सर्व्हिसेस, सेफकीपिंग आणि इतर संबंधित सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्य सेवा प्रदान करते.

आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या रकमेपैकी कंपनी विद्यमान व्यवसायासाठी टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी 7 कोटी वापरणार आहे. डिपॉझिटरी पार्टिसिपंट, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटच्या सेवा सुरू करण्यासाठी कंपनीची शाखा असलेल्या बीकन इन्व्हेस्टर होल्डिंग्समध्ये 6.99 कोटी आणि बोरिवलीत नवीन ऑफिस परिसर खरेदी करण्यासाठी 3.25 कोटी गुंतवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, निधीचा काही भाग सामान्य कंपनीच्या कामकाजासाठी वापरला जाणार आहे.

कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात 19.92 कोटीचा महसूल मिळवला होता. या कालावधीत निव्वळ नफा 5.16 कोटी होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, महसूल 14.81 कोटी होता आणि निव्वळ नफा 3.84 कोटी होता. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 10 ते 10 रुपयांच्या प्रीमियमवर अर्थात 16.67 टक्के अपर प्राइस बँडमध्ये ट्रेडिंग करत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com