Belstar Microfinance IPO
Belstar Microfinance IPOsakal

Belstar Microfinance IPO : बेलस्टार मायक्रोफायनान्स आणणार 1300 कोटीचा आयपीओ

बेलस्टार मायक्रोफायनान्स (Belstar Microfinance) लवकरच त्यांचा आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. इश्यूच्या माध्यमातून 1300 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

बेलस्टार मायक्रोफायनान्स (Belstar Microfinance) लवकरच त्यांचा आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. इश्यूच्या माध्यमातून 1300 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), चेन्नईस्थित संस्थेच्या या आयपीओअंतर्गत 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 300 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेलअंतर्गत (OFS) इनव्हेस्टर शेअरहोल्डर्सद्वारे विकले जातील.

डॅनिश ऍसेट मॅनेजमेंट फर्म एमएजे इन्वेस्टने ओएफएसचा भाग म्हणून 175 कोटी किमतीचे शेअर्स विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर अरुम होल्डिंग्ज लिमिटेड (रु. 97 कोटी) आणि ऑगस्टा इन्व्हेस्टमेंट्स झिरो पीटीई लिमिटेड (28 कोटी) आहेत. Maj इन्व्हेस्टने पहिल्यांदा बेलस्टार मायक्रोफायनान्समध्ये 2018 मध्ये आणि पुन्हा 2022 मध्ये गुंतवणूक केली. सध्या, प्रमोटर्सपैकी एक असलेल्या मुथूट फायनान्सचा बेलस्टार मायक्रोफायनान्समध्ये 66 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. 760 कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूमधून मिळालेली रक्कम पुढील कर्जासाठी भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.

बेलस्टार मायक्रोफायनान्स ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी – मायक्रो फायनान्स इंस्टीट्यूशन (NBFC-MFI) आहे. कंपनी मायक्रो फायनान्स, स्मॉल एंटरप्राइज, कंझ्युमर गुड्स, फेस्टिव्हल, एज्युकेशन आणि इमर्जन्सी लोन यासारखी लोन प्रोडक्ट्स देते. त्याचे कर्ज देणारे मॉडेल प्रामुख्याने 'सेल्फ हेल्प ग्रुप' (SHG) मॉडेलवर केंद्रित आहे, जे 31 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण कर्ज पोर्टफोलिओच्या 57 टक्के आहे. मायक्रोफायनान्स फर्मने डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांत 1,283 कोटीच्या महसुलावर 235 कोटीचा नफा कमावला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांची कंपनीच्या सार्वजनिक इश्यूच्या व्यवस्थापनासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Belstar Microfinance IPO
IPO Open : एसके फायनान्स 2200 कोटीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत ; पेपर्स सेबीकडे सादर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com