Banking Crisis : क्रेडिट सुइस बँकेने तारणकर्त्या बँकेलाही आणले गोत्यात; जगभरातील बँकिंग क्षेत्र संकटात

बँकेचे शेअर्स घसरल्यानंतर जगभरातील शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
credit suisse shares tank 63 percent with ubs shares were down 14 percent
credit suisse shares tank 63 percent with ubs shares were down 14 percent Sakal

Banking Crisis : अमेरिकेच्या बँकांवरील संकट आता युरोपपर्यंत पोहोचले आहे. स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस बँक संकटाचा सामना करत आहे. 166 वर्षे जुन्या या बँकेवर असलेला धोका संपूर्ण जगासाठी संकट बनू शकतो.

क्रेडिट सुइस ही UBS AG नंतर स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. बँकेचे शेअर्स घसरल्यानंतर जगभरातील शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला.

जी बँक आतापर्यंत इतर बँका आणि वित्तीय संस्थांना मानांकन देत होती, त्याच बँकेला आता UBS ने ते सुमारे 3.25 डॉलरमध्ये विकत घेण्याचे मान्य केले आहे. (Credit Suisse shares tank 63 percent with ubs shares were down 14 percent)

स्वित्झर्लंडने आपली दुसरी सर्वात मोठी बँक क्रेडिट सुइस वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. बँक यूबीएसने विकत घेतल्यानंतर क्रेडिट सुईसला काहीसा दिलासा मिळेल, असे मानले जात होते.

BBC ने दिलेल्या वृत्तानुसार बाजार उघडताच क्रेडिट सुइसचा शेअर 63 टक्क्यांनी घसरला. यासोबतच यूबीएसचे शेअर्सही 14 टक्क्यांनी घसरले आहेत. म्हणजेच क्रेडिट सुईसला वाचावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत आहे पण आता यूबीएसही अडचणीत आली आहे.

त्यामुळे बँकिंगचे संकट अधिकच गडद झाले आहे. स्वित्झर्लंडच्या या दोन्ही बँकांचा जगातील महत्त्वाच्या बँकांच्या यादीत समावेश आहे.

म्हणजेच, या अशा बँका आहेत ज्यांच्या बुडण्याने जगाच्या आर्थिक व्यवस्थेत संकट निर्माण होऊ शकते. बँकिंग संकटाची सुरुवात अमेरिकेतून झाली. सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यानंतर सिग्नेचर बँकही कोसळली.

यासोबतच फर्स्ट रिपब्लिक बँकही बुडण्याच्या मार्गावर आहे. एवढेच नाही तर सोशल सायन्स रिसर्च नेटवर्कवर 'Monetary Tightening and U.S. Bank Fragility in 2023: Mark-to-Market Losses and Uninsured Depositor Runs?' अहवालानुसार अमेरिकेतील 186 बँका कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

स्विस अधिकाऱ्यांनी घोषणा केली की UBS बँक क्रेडिट सुईस खरेदी करेल. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बारसेट म्हणाले की हा करार आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्राच्या स्थिरतेसाठी एक मोठे पाऊल आहे.

ते म्हणाले की क्रेडिट सुईस कोसळल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेसाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या असत्या. क्रेडिट सुइसचे अध्यक्ष लेहमन यांनी या कराराचे वर्णन गेम चेंजर म्हणून केले आहे.

credit suisse shares tank 63 percent with ubs shares were down 14 percent
SVB Collapse : SVB आणि Signature प्रमाणेच आणखी 186 बँका धोक्यात; अहवालात...

या करारामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट होईल आणि क्रेडिट सुईसच्या शेअर्सची घसरण थांबेल, असा विश्वास होता.

जगभरातील शेअर बाजारावर मोठा परिणाम :

BBC ने दिलेल्या वृत्तानुसार आज 20 मार्च 2023 रोजी बाजार उघडताच क्रेडिट सुइसचे शेअर्स 63 टक्क्यांनी घसरले. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता कंपनीचे शेअर्स 58.69 टक्क्यांनी घसरत होते. त्याचप्रमाणे यूबीएसचे शेअर्स 9.61 टक्क्यांनी व्यवहार करत होते.

credit suisse shares tank 63 percent with ubs shares were down 14 percent
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

बँकिंग संकट आणि मंदीच्या भीतीमुळे शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम आज आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई दोन महिन्यांच्या

नीचांकी पातळीवर बंद झाला. जपानमध्ये बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक 1.88 टक्क्यांनी घसरला. या महिन्यात ते आतापर्यंत 13.6 टक्क्यांनी घसरले आहेत. भारतातही बीएसई सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com