
Stock Market Today: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी असून, सेन्सेक्सने जवळपास 650 अंकांच्या वाढीसह दमदार सुरुवात केली. तर निफ्टीमध्ये सुमारे 170 अंकांची वाढ झाली. शनिवारी बँकिंग कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर बँक निफ्टीने पहिल्यांदाच 58,000 चा उच्चांक पार केला. बँक निफ्टीमध्ये जवळपास 500 अंकांची वाढ दिसून आली आहे.