Muhurat Trading 2023: दिवाळीतही नफा कमावण्याची सुवर्णसंधी, 'या' दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग, असा आहे इतिहास

Diwali Muhurat Trading 2023 Time: दरवर्षी दिवाळीनिमित्त BSE आणि NSE मध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाते.
Diwali Muhurat Trading 2023 Time
Diwali Muhurat Trading 2023 TimeSakal

Diwali Muhurat Trading 2023 Time: BSE आणि NSE मध्ये 12 नोव्हेंबरला संध्याकाळी एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. हे विशेष ट्रेडिंग सत्र संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 7:15 वाजता संपेल. त्या अगोदर 15 मिनिटांचे प्री-मार्केट सत्र असणार आहे.

दरवर्षी दिवाळीनिमित्त BSE आणि NSE मध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाते. दिवाळीच्या दिवशी शेअर्स खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने व्यापार केल्याने घर आणि कुटुंबात समृद्धी येते, असे मानले जाते.

मुहूर्ताच्या दिवशी होणारे सर्व व्यवहार एकाच दिवशी निकाली निघतात. यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आहे. साधारणत: रविवारी शेअर बाजारात सुट्टी असते. पण, दिवाळीनिमित्त त्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे.

गेल्या 10 मुहूर्ताच्या ट्रेडिंग सत्रांपैकी सेन्सेक्स 7 वेळा वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक मुहूर्ताच्या व्यवहारात तेजीसह बंद झाले. 2021 मध्येही मुहूर्ताच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला होता.

Diwali Muhurat Trading 2023 Time
ZEE vs SEBI Order: ZEEL प्रकरणात पुनित गोएंका यांना मोठा दिलासा, SAT ने SEBI च्या आदेशाला दिली स्थगिती

मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास काय आहे?

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते, पण संध्याकाळी काही काळ ट्रेडिंग सुरू होते ज्यामध्ये गुंतवणूकदार दिवाळीच्या दिवशी गुंतवणूक करू शकतात.

शेअर मार्केटमधील मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा 51 वर्ष जुनी असून हिंदू धर्मानुसार दिवाळीचा दिवस कोणत्याही नवीन गुंतवणूक, खरेदी, जमिनीचा व्यवहार इत्यादीसाठी शुभ मानला जातो. साधारणत: दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्याऐवजी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये जास्त गुंतवणूक करतात कारण हा दिवस शुभ मानला जातो.

Diwali Muhurat Trading 2023 Time
Niti Aayog: 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरची होईल

15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहतील

स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की 12 नोव्हेंबर रोजी इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स तसेच सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) मध्ये संध्याकाळी एक तास ट्रेडिंग होईल.

दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहेत. बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी BSE आणि NSE मध्ये व्यवहार होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com