
Trump-Zelensky Clash Stock Market: काल शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात झालेल्या गोंधळानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर आपण एकूण BSE मार्केट कॅपिटलायझेशनवर नजर टाकली तर गेल्या पाच महिन्यांत त्यात 92 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, सतत पाच महिन्यांच्या घसरणीमुळे जवळपास 30 वर्षांचा विक्रम मोडला आहे. काल सेन्सेक्स 1400 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी 420 अंकांनी घसरला.