Elgi Equipments Share : व्हिएतनाममध्ये एल्गी इक्विपमेंट्सने उभी केली सब्सिडियरी, शेअर्समध्ये वाढ...

या अंतर्गत ते आयात, निर्यात, होलसेल, डिस्ट्रीब्यूशन, रिटेल विक्री आणि कॉम्प्रेसरचे इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्समध्ये गुंतलेला आहे.
Elgi Equipments Share
Elgi Equipments Share sakal

एअर कंप्रेसर बनवणारी कंपनी एल्गी इक्विपमेंट्सने (Elgi Equipments) व्हिएतनाममध्ये स्वतःच्या मालकीची सब्सिडियरी कंपनी उघडली आहे. या कंपनीचे नाव एल्गी कंप्रेसर व्हिएतनाम एलएलसी (Elgi Compressors Vietnam LLC) असे ठेवण्यात आल्याचे शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे. (Elgi Compressors Vietnam LLC company Elgi Equipments Share increased )

1 मार्च 2023 रोजी तिला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही मिळाले आहे. त्यांची उपकंपनी व्हिएतनाममध्ये एअर कंप्रेसरचा व्यवसाय करणार आहे. या अंतर्गत ते आयात, निर्यात, होलसेल, डिस्ट्रीब्यूशन, रिटेल विक्री आणि कॉम्प्रेसरचे इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्समध्ये गुंतलेला आहे.

एल्गी इक्विपमेंट्सने गेल्या 2 दशकात केवळ 1 लाखाच्या गुंतवणुकीवर त्यांच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. कंपनीचे शेअर्स सध्या 467.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पण जवळपास 20 वर्षांपूर्वी, 13 मार्च 2003 रोजी एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 4.13 रुपये होती.

अशा प्रकारे, गेल्या 2 दशकात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 11,200% वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या 1 लाख रुपयांची किंमत 1.13 कोटी रुपये झाली असती.

Elgi Equipments Share
Stock Split : 'या' शेअरकडून स्टॉक स्प्लिटची घोषणा, अधिक जाणून घेऊयात...

कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 13.28% वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 42.69% परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत हा स्टॉक 227.67 टक्के वाढला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com