Emcure Pharma IPO: एमक्योर फार्मास्युटिकल्सचा आयपीओ खुला, जाणून घ्या डिटेल्स

Emcure Pharma IPO: नमिता थापर यांची कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सचा (Emcure Pharmaceuticals) आयपीओ आजपासून खुला झाला आहे. यासाठी 960-1008 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
Emcure Pharma IPO
Emcure Pharma IPOSakal

Emcure Pharma IPO: नमिता थापर यांची कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सचा (Emcure Pharmaceuticals) आयपीओ आजपासून खुला झाला आहे. यासाठी 960-1008 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओमध्ये 5 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येतील. आयपीओ बंद झाल्यानंतर, एमक्योर फार्माचे शेअर्स 10 जुलैला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतात.

कंपनीच्या आयपीओमध्ये 800 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. 1151 कोटीच्या सुमारे 1.14 कोटी शेअर्सची विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल. आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे.

ओएफएसमध्ये, प्रमोटर सतीश रमणलाल मेहता, सुनील रजनीकांत मेहता, नमिता विकास थापर आणि समित सतीश मेहता हे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. या व्यतिरिक्त, पुष्पा रजनीकांत मेहता, भावना सतीश मेहता, कामिनी सुनील मेहता, बीसी इन्व्हेस्टमेंट्स IV, अरुणकुमार पुरुषोत्तमलाल खन्ना, बर्जिस मिनु देसाई आणि सोनाली संजय मेहतादेखील ऑफर-फॉर-सेलमध्ये त्यांचे शेअर्स विकतील.

एमक्योर फार्माने आयपीओमध्ये 1 लाख 8 हजार 900 इक्विटी शेअर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले आहेत. हे शेअर्स कर्मचाऱ्यांना सवलतीने दिले जातील. याशिवाय, आयपीओपैकी अर्धा म्हणजे 50 टक्के क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी (QIB), 35 टक्के रिटेल इनवेस्टर्ससाठी आणि 15 टक्के नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी (NII) राखीव ठेवण्यात आला आहे.

Emcure Pharma IPO
Koo Shut Down: भारतीय ट्विटर 'कु'ला लागली घरघर; लवकरच बंद होणार ॲप, काय आहे कारण?

एमक्योर फार्मा भारतातील बहुतेक उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उपस्थित आहे. यामध्ये स्त्रीरोग, हृदयरोग, विटामिन, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, एचआयव्ही अँटीव्हायरल, हेमेटोलॉजिकल आणि ऑन्कोलॉजी/अँटी-निओप्लास्टिक इत्यादींचा समावेश आहे.

एमक्योर फार्माचा भारत, युरोप आणि कॅनडामध्ये विस्तार आहे. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी 600 कोटी वापरले जातील. मार्च 2024 अखेरपर्यंत तिच्या बॅलेंस-शीटमध्ये 2,091.9 कोटीचे कर्ज होते. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.

Emcure Pharma IPO
Poverty in India: भारतात गरिबी झाली कमी; गेल्या 12 वर्षांत परिस्थितीत असा झाला बदल, अहवालात नेमकं काय?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com