
Gabriel India Shares : गॅब्रिएल इंडियाचे शेअर्स देतील दमदार परतावा, तज्ज्ञांना विश्वास...
Gabriel India Share Market : शॉक ऍब्जॉर्बर्स, स्ट्रट्स आणि फ्रंट फोर्क्ससारखे राइड कंट्रोल प्रॉडक्ट्स बनवणारी आघाडीची कंपनी गॅब्रिएल इंडियाने (Gabriel India) गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. लाँग टर्ममध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. गॅब्रिएलच्या शेअर्समध्ये यावर्षी 22 टक्क्यांची घसरण झाली असली तरी बाजारातील तज्ज्ञ याकडे संधी म्हणून पाहा असे सांगत आहेत.
आताच्या किंमतीपासूम हे शेअर्स 17 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या हे शेअर्स बीएसईवर 147.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीची मार्केट कॅप 2124.49 कोटी आहे.
गॅब्रिएलचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2001 रोजी 1.35 रुपयांवर होते आणि आता हे शेअर्स 147.90 रुपयांवर आहेत. याचा अर्थ गॅब्रिएलच्या शेअर्समध्ये 1 लाखाची गुंतवणूक सुमारे 21 वर्षांत 1.10 कोटी रुपये झाली आहे. गॅब्रिएलच्या शेअर्सने लाँग टसेच शॉर्ट टर्ममध्ये दमदार परतावा दिला आहे.
गेल्या वर्षी 12 मे 2022 रोजी त्याची किंमत 102.45 रुपये होती, जी एका वर्षातील नीचां आहे. यानंतर, 29 नोव्हेंबर 2022 रोजी तो सहा महिन्यांत 96 टक्क्यांनी वाढून 200.65 रुपयांवर पोहोचला, जी गेल्या पाच वर्षांतील उच्चांक आहे. पण त्यानंतर शेअर्सची तेजी इथेच थांबली आणि आता हा शेअर 26 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. पण आता हा शेअर वाढू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. ब्रोकरेज हाऊसने 170 रुपयांचे टारगेट निश्चित करत बाय रेटींग दिले आहे.
डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या एकूण विक्रीत ईव्हीचा वाटा 9 टक्के होता, जो वर्षभराच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढला आहे. ईव्हीमध्ये त्याचा 60 टक्के मार्केट शेअर आहे आणि ओला, एथर, टीव्हीएस, अँपिअर आणि ओकिनावा हे त्याचे कस्टमर्स आहेत. डच ट्रक आणि ई-सायकलच्या ऑर्डरमुळे कंपनीची जागतिक उपस्थिती आणखी मजबूत होईल. कंपनीला युटिलिटी वाहनांसाठी नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 50% वाढ होत आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.