
थोडक्यात:
एचडीएफसी बँक पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत असून, 19 जुलैच्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांना मोफत शेअर्स मिळतात, मात्र कंपनीच्या फ्री रिझर्व्सवर ताण येतो.
बोनस शेअर्सच्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.
HDFC Bank Bonus Share: एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी बाजारमूल्य असलेली बँक आहे. आता बँक आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 19 जुलै रोजी होणार असून, यामध्ये बोनस शेअर्स आणि FY26 साठी अंतरिम लाभांश यावर चर्चा केली जाऊ शकते.