Hyundai IPO: गुंतवणूक करण्याची मोठी संधी! भारतातील सर्वात मोठा IPO येणार; सेबीकडे अर्ज करण्याच्या तयारीत

Hyundai India IPO: दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने आपल्या भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला शेअर बाजारात लिस्ट करण्याची तयारी सुरु केली आहे. Hyundai Motor India चा IPO हा आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो.
Hyundai IPO
Hyundai IPOSakal
Updated on

Hyundai India IPO: दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने आपल्या भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला शेअर बाजारात लिस्ट करण्याची तयारी सुरु केली आहे. Hyundai Motor India चा IPO हा आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो.

कंपनीने या इश्यूद्वारे 25,000 कोटी रुपये ते 30,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. आतापर्यंत लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने IPO द्वारे बाजारातून सर्वाधिक 21,000 कोटी रुपये उभे केले होते.

मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे की Hyundai Motor India Limited ने IPO लॉन्च करण्यासाठी सल्लागार म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली यांची निवड केली आहे. या दोन्ही गुंतवणूक बँका Hyundai India ला IPO आणण्यासाठी मदत करतील.

दक्षिण कोरियाची कंपनी तिच्या भारतीय उपकंपनीच्या IPO साठीचा मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRPH) जून किंवा जुलैच्या अखेरीस SEBI कडे पाठवेल. या प्रकरणाशी संबंधित चार जणांनी मनीकंट्रोलला ही माहिती दिली.

Hyundai IPO
GST: निवडणुकीनंतर जीएसटी दरात बदल होणार का? जीएसटी सवलतीचा लाभ गरीबांपेक्षा श्रीमंतांना अधिक

Hyundai चा IPO LIC पेक्षा मोठा असेल

Hyundai Motor India च्या IPO चा आकार 2.5-3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25,000-30,000 कोटी रुपये असू शकते. LIC च्या IPO चा आकार 2.7 अब्ज डॉलर होता. यापूर्वी, मनीकंट्रोलने अहवाल दिला होता की Hyundai मोटर कंपनीने Citi, JP Morgan आणि HSBC सिक्युरिटीजना त्यांच्या भारतीय उपकंपनीच्या IPO साठी गुंतवणूक बँका म्हणून नियुक्ती केली होती. आता कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या दुसऱ्या स्त्रोताने मनीकंट्रोलला सांगितले की कंपनीच्या भारतीय उपकंपनीचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलर असू शकते. IPO चे मूल्य आणि आकार अजून ठरलेला नाही.

Hyundai IPO
Tax: भारतातील आर्थिक असमानता ऐतिहासिक उच्चांकावर; श्रीमंतांवर कर लावावा, अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटींची शिफारस

Hyundai ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी

Hyundai Motor India ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे. Hyundai Motor India चा महसूल FY23 मध्ये 60,000 कोटी रुपये होता. कंपनीचा नफा 4,653 कोटी रुपये होता. नॉन-लिस्टेड कार कंपन्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. Hyundai च्या जागतिक विक्रीत भारतीय युनिटचा सुमारे 13 टक्के वाटा आहे. त्याचे प्रमुख मॉडेल i20, Verna, Creta, Aura आणि Tucson आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.