IPO News Update : इंडेजीनचा आयपीओ आजपासून खुला ; ग्रे मार्केटमध्ये शेअर्स रॉकेट

इंडेजीनचा (Indegene IPO) आयपीओ आजपासून खुला झाला आहे आणि यात 8 मेपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. आयपीओची साईज 1,842 कोटीची आहे. आयपीओचा प्राइस बँड 420 - 452 रुपये तर लॉट साईज 33 शेअर्सची निश्चित करण्यात आला आहे.
IPO News Update
IPO News Update sakakl

इंडेजीनचा (Indegene IPO) आयपीओ आजपासून खुला झाला आहे आणि यात 8 मेपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. आयपीओची साईज 1,842 कोटीची आहे. आयपीओचा प्राइस बँड 420 - 452 रुपये तर लॉट साईज 33 शेअर्सची निश्चित करण्यात आला आहे. इंडेजीन ही एक कमर्शियलायझेशन कंपनी आहे, जी लाइफ साइंसेज इंडस्ट्रीजना कमर्शियलायझेशन सर्व्हिस पुरवते. ग्रे मार्केटमध्ये शेअर्स अतिशय चांगले परफॉर्म करत आहे. ग्रे मार्केट एक अनऑथोराईज्ड मार्केट आहे, जिथे कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्यापुर्वी ट्रेड करतात.

इंडेजीनच्या आयपीओमध्ये 760 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, सुमारे 2 कोटी 39 लाख 32 हजार 732 रुपयांचे इक्विटी शेअर्स त्याच्या विद्यमान शेअरहोल्डर्सच्या वतीने ऑफर-फॉर-सेलअंतर्गत (OFS) आणले जातील. ज्या शेअरहोल्डर्सच्या वतीने ओएफएसमध्ये विक्री केली जाणार आहे त्यात मनीष गुप्ता, डॉ. राजेसन भास्करन नायर, अनिता नायर, विडा विश्वस्त, बीपीसी जेनेसिस फंड I एसपीव्ही, बीपीसी जेनेसिस फंड I-A एसपीव्ही आणि कार्लाइल ग्रुपचे सीए डॉन इन्व्हेस्टमेंट यांचा समावेश आहे.

कार्लाईल ग्रुप व्यतिरिक्त नादाथूर फॉरेस्टनेही यात गुंतवणूक केली आहे. ही इन्फोसिसचे सह-संस्थापक नदाथुर एस राघवन यांच्या मालकीची खासगी इक्विटी फर्म आहे. नदाथूर फॉरेस्टचा इंडेजीनमध्ये 23.64 टक्के हिस्सा आहे आणि तो त्याचा सर्वात मोठा शेअरहोल्डर आहे. नदाथुरच्या कार्लाइन ग्रुपची सीए डॉन इन्व्हेस्टमेंट्स ही कंपनीतील 20.42 टक्के हिस्सेदारी असलेला दुसरा सर्वात मोठा शेअरहोल्डर आहे.

ग्रीनविच-मुख्यालय असलेल्या प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्राइटन पार्क कॅपिटलच्या मालकीचे बीपीसी जेनेसिस फंड I एसपीव्ही आणि बीपीसी जेनेसिस फंड I-A एसपीव्ही यांच्याकडे कंपनीत मिळून 12.07 टक्के हिस्सेदारी आहे.

IPO News Update
SIP Investment : 20 वर्षात पाच हजारांची एसआयपी काय कमाल करते ते जाणून घ्या...

इंडेजीनच्या आयपीओपैकी 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव असतील. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) 15 टक्के हिस्सा राखीव ठेवला जाईल. तर उर्वरित 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com