
Monsoon Effects Stock Market: मान्सून लवकर आल्याने शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. निफ्टीने आज 150 पेक्षा जास्त अंकांची उडी मारली आणि 25,000 चा टप्पा ओलांडला. तर आज आरआयएल, एल अँड टी, एम अँड एम आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सनी बाजाराचा उत्साह वाढवला आहे. बँक निफ्टी देखील तेजीत आहे. चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेने ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. निफ्टी ऑटो इंडेक्स जवळपास एक टक्क्याने वाढला आहे.