Apple Employee: अॅपल कंपनी माजी कर्मचाऱ्याकडून वसूल करणार 155 कोटी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

आयफोन निर्माता कंपनी अॅपल आता स्वतःच्याच माजी कर्मचाऱ्याकडून 155 कोटी वसूल करणार आहे.
Apple Employee
Apple EmployeeSakal

Apple Employee: आयफोन निर्माता कंपनी अॅपल आता स्वतःच्याच माजी कर्मचाऱ्याकडून 155 कोटी रुपयांचा दंड वसूल करणार आहे. कंपनीची फसवणूक करणाऱ्या अॅपलच्या माजी कर्मचाऱ्याला आता 3 वर्षांचा तुरुंगवास आणि कंपनीला 155 कोटी रुपये परत करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय वंशाचे कर्मचारी धीरेंद्र प्रसाद यांना कंपनीला तीन वर्षे व्याजासह 19 दशलक्ष डॉलर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धीरेंद्र प्रसाद यांनी कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळले होते. आता या प्रकरणी शिक्षा जाहीर झाली आहे.

भारतीय वंशाचा कर्मचारी 2008 ते 2018 या काळात अॅपल कंपनीत काम करत होता. धीरेंद्रने कंपनीची 139 कोटी रुपयांची फसवणूक केली. पार्ट्स विकत घेण्यापासून ते जुने ऍपल उपकरण दुरुस्त करण्यापर्यंत बरीच कामे त्याने केली.

आयफोन आणि अॅपलच्या इतर उत्पादनांची वॉरंटी असलेली जुनी उपकरणेही तो खरेदी करत असे. त्याने दोन कंपन्यांशी करार केला होता. या कंपन्या अॅपलला भाग विकतात. त्यांचे सुटे भाग विकत घेऊन तो आपला खिसा भरत होता.

धीरेंद्र वेगवेगळ्या मार्गांनी कंपनीची फसवणूक करत होता. लाच घेणे, खोट्या पावत्या देणे, आयफोनचे पार्ट्स चोरणे आणि अॅपलकडून पैसे मिळवणे. धीरेंद्रला पकडल्यावर त्याने आपली चूक मान्य केली.

Apple Employee
Adani Group: सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अदानी समूहाची प्रतिक्रिया; म्हणाले, मीडियाने...

अॅपलच्या ग्लोबल सर्व्हिस सप्लाई चेनमध्ये धीरेंद्रने बराच काळ खरेदीदार म्हणून काम केले. 2018 पर्यंत तो अशाच प्रकारे कंपनीचे नुकसान करत राहिला. त्याने अॅपलचे सुमारे 140 कोटींचे नुकसान केले.

काही लोकांनी कंपनीची फसवणूक करण्यात धीरेंद्रला मदत केली, ज्यामध्ये रॉबर्ट गॅरी हॅन्सन आणि डॉन एम. बेकर यांची नावे आहेत.

या व्यक्तींवर मार्च 2022 मध्ये आरोप लावण्यात आला होता. आता या प्रकरणी शिक्षा जाहीर झाली असून त्याला 155 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Apple Employee
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com