Infosys Share: इन्फोसिसचा 12,500 कोटी रुपयांचा करार रद्द होताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

Infosys Share Price: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. Infosys Limited चे शेअर्स 1540 रुपयांवर होते, ते आता 23 रुपयांनी घसरले आहेत. एनआर नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस लिमिटेड कंपनीला मोठा फटका बसला आहे.
Infosys mega AI deal loss affects stock, shares dip nearly 3 percent
Infosys mega AI deal loss affects stock, shares dip nearly 3 percent Sakal

Infosys Share Price: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. Infosys Limited चे शेअर्स 1540 रुपयांवर होते, ते आता 23 रुपयांनी घसरले आहेत. एनआर नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस लिमिटेड कंपनीला मोठा फटका बसला आहे.

कारण गेल्या सप्टेंबरमध्ये कंपनीने जागतिक फर्मसोबत केलेला करार रद्द झाला आहे. हा करार 1.5 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 12,500 कोटी रुपयांचा होता. इन्फोसिसने शनिवारी हा करार रद्द झाल्याची माहिती दिली. सप्टेंबर 2023 मध्ये इन्फोसिसने 15 वर्षांसाठी हा करार (एमओयू) केला होता.

इन्फोसिसच्या वतीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना असे म्हटले आहे की, जागतिक फर्मने इन्फोसिससोबत केलेला एमओयू रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसने त्या जागतिक कंपनीचे नाव उघड केले नाही. इन्फोसिसने हा करार रद्द करण्यामागचे कारणही स्पष्ट केलेले नाही.

कंपनीचे माजी सीएफओ निलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतील इन्फोसिससाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे. त्यांनी कंपनीतून दिलेला राजीनामा 31 मार्च 2024 पासून लागू होईल.

Infosys mega AI deal loss affects stock, shares dip nearly 3 percent
मोतीसन्स ज्वेलर्सचा IPO लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल! मुथूट मायक्रोफिन-सूरज इस्टेट केली निराशा

इन्फोसिसने नुकत्याच जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये कंपनीने 6,212 कोटी रुपयांची कमाई केली होती. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीने कमावलेला हा नफा वार्षिक आधारावर 3 टक्के वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा 6,026 कोटी रुपये होता. कंपनीचे 6.46 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

Infosys mega AI deal loss affects stock, shares dip nearly 3 percent
NBFC Stock: गोल्ड लोन देणाऱ्या 'या' एनबीएफसी स्टॉकमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांना विश्वास

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com