Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय इक्विटी इंडेक्स निफ्टी 25,200 च्या आसपास राहिला आणि शेवटी घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 202.80 अंकांनी अर्थात 0.25 टक्क्यांनी घसरून 82,352.64 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 81.10 अंकांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 25,198.70 वर बंद झाला.