Share Market Today: आज शेअर बाजारात मिड आणि स्मॉल कॅपच्या शेअर्सची स्थिती कशी असेल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: गुरुवारी एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ दिसून आली. तीन दिवसांच्या घसरणीनंतर, मिड आणि स्मॉल कॅप्सने जोरदार उसळी घेतली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 335 अंकांनी वधारला आणि 73,097 वर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): गुरुवारी एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ दिसून आली. तीन दिवसांच्या घसरणीनंतर, मिड आणि स्मॉल कॅप्सने जोरदार उसळी घेतली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 335 अंकांनी वधारला आणि 73,097 वर बंद झाला.

त्याचवेळी निफ्टी 149 अंकांनी वाढून 22,147 वर बंद झाला. तर बँक निफ्टी 191 अंकांनी घसरून 46,790 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, मिडकॅप 930 अंकांनी वाढून 46,901 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी डेली टाइम फ्रेमवर शेवटच्या ट्रेडिंग सत्राच्या कँडलच्या खालच्या अर्ध्या भागाच्या आसपास कंसोलिडेट झाल्यामुळे बाजारातील भावना नकारात्मक राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले.

याशिवाय निफ्टी आरएसआयमध्ये मंदीच्या क्रॉसओव्हरसह 21 इएमएच्या खाली बंद झाला आहे. सत्राच्या अखेरीस निफ्टीला पुन्हा रायझिंग चॅनलकडे ढकलण्यात बुल्स यशस्वी झाले, जे तेजीचा ट्रेंड परत येण्याची शक्यता दाखवत आहे.

आता निफ्टीला 22,200-22,250 झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो. 22,250 चा रझिस्टंस पार केल्यानंतर निफ्टी नजीकच्या काळात 22,500 च्या दिशेने जाऊ शकतो. तर खाली 22,050-22,000 वर सपोर्ट दिसत आहे.

Share Market Investment Tips
India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आत्मविश्वास वाढला; फिचने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांपर्यंत वाढवला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • हिंदाल्को (HINDALCO)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • ओएनजीसी (ONGC)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • व्होल्टास (VOLTAS)

Share Market Investment Tips
Petrol Price: लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त, कोणत्या शहरात कसे असतील दर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com