Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Share Market Investment Tips: मंगळवारी फिन निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. यात सर्वात मोठी वाढ फार्मा आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये दिसून आली. मेटल आणि इन्फ्रा शेअर्सवर दबाव होता.
Investment Tips
Investment TipsSakal

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी फिन निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. यात सर्वात मोठी वाढ फार्मा आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये दिसून आली. मेटल आणि इन्फ्रा शेअर्सवर दबाव होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री झाली.

रियल्टी, पीएसई आणि एनर्जी शेअर्सवर दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला आणि 75,171 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 44 अंकांनी घसरून 22,888 वर बंद झाला. निफ्टी बँक 140 अंकांनी घसरून 49,142 वर बंद झाला. दुसरीकडे, मिडकॅप 467 अंकांनी घसरला आणि 52,295 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 44.30 अंकांच्या घसरणीसह 22,888.15 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. फार्मा सेक्टरने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, त्यानंतर मिडिया सेक्टरचा नंबर लागला. त्याच वेळी, रियल्टी आणि पीएसयू बँकिंग 1 टक्क्यांहून अधिक घसरले.

मिड आणि स्मॉल कॅपमध्येही प्रॉफीट बुकिंग आणि करेक्शन दिसून आले. निफ्टीने डेली टाईम फ्रेमवर आणखी एक बियरिश कँडल तयार केली आहे. आता निफ्टीला 22,780 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. तर निफ्टीला 23110 च्या पातळीवर रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो.

मंगळवारी इंडेक्स एका मर्यादेत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. दोन्ही बाजूंनी ब्रेकआउट नसल्यामुळे बाजाराची दिशा स्पष्ट नव्हती. 23000 स्ट्राइक प्राईसवर बरेच कॉल रायटिंग पाहायला मिळाली. यानंतर 23100 आणि 22900 स्ट्राइकवरही खूप कॉल रायटिंग झाली.

हेवी कॉल रायटिंगच्या तुलनेत पुट रायटर कमी सक्रिय असल्याचे दिसून आले, ज्यामुळे पीसीआरमध्ये घट झाली. वोलॅटिलिटी इंडेक्स इंडिया VIX ची हाय लेव्हल दर्शवते की भविष्यात बाजारात खूप अस्थिरता असू शकते. आता वरच्या बाजूने, 22950-23000 च्या झोनमध्ये निफ्टीसाठी रझिस्टंस दिसून येत आहे. त्याच वेळी, 22800/22600 च्या झोनमध्ये डाउनसाइडवर सपोर्ट आहे.

Investment Tips
Raghuram Rajan: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास अर्थव्यवस्थेचं काय होणार? रघुराम राजन म्हणाले...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • बीपीसीएल (BPCL)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • आयडिया (IDEA)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

Investment Tips
Adani : अदानी एंटरप्रायझेस उभारणार १६,६०० कोटी; ‘क्यूआयपी’ योजनेला संचालक मंडळाची मंजुरी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com