Share Market Today: शेअर बाजारातील घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. या ट्रेडिंग सत्रात निफ्टी दिवसभरात 22,700 च्या आसपास घसरला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले. या ट्रेडिंग सत्रात निफ्टी दिवसभरात 22,700 च्या आसपास घसरला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 667.55 अंकांच्या अर्थात 0.89 टक्क्यांच्या घसरणीसह 74,502.90 वर बंद झाला आणि निफ्टी 183.50 अंकांच्या म्हणजेच 0.80 टक्क्यांच्या घसरणीसह 22,704.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने डेली चार्टवर 22,780 चा सपोर्ट मोडला. पण गुरुवारचा मंथली एक्स्पायरी डे पाहता शॉर्ट कव्हरिंग मूव्ह दिसू शकेल असे वाटत असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर म्हणाले. यामुळे निफ्टी ट्रायएंगल पॅटर्न ब्रेकआउट पॉइंट म्हणजेच 22,780 च्या वर जाऊ शकतो.

अलीकडची घसरण ही गुंतवणूकदारांच्या सावध वृत्तीचे लक्षण असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. निफ्टीला 22,550 च्या आसपास सपोर्ट मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मेच्या डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या एक्सपायरीमुळे बरीच अस्थिरता अपेक्षित आहे. आक्रमक लाँग पोझिशन्स मर्यादित करण्याच्या आणि हेजिंग धोरण स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला.

बँक निफ्टी इंडेक्स 49000 च्या सपोर्टखाली उघडला. बुधवारी दिवसभर या पातळीच्या खाली व्यवहार दिसून आले. बँक निफ्टी बुधवारी 21 दिवसांच्या EMA जवळ 48,400 वर बंद झाला. जर बँक निफ्टी 21-दिवसांच्या EMA वर टिकला नाही, तर विक्रीचा आणखी दबाव वाढेल आणि तो 48,000 पर्यंत घसरेल. आता बँक निफ्टीला 48,400 वर सपोर्ट दिसत आहे. तर 49,000 ची पातळी त्याच्यासाठी नवीन रझिस्टंस बनली आहे.

Share Market Investment Tips
Raghuram Rajan: 'व्यावसायिकांनी मला धमक्या दिल्या'; RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा दावा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

Share Market Investment Tips
Jobs For Freshers: फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध; 'या' तीन क्षेत्रात सर्वाधिक मागणी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com