Share Market Today: इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आज कसा असेल शेअर बाजार? काय आ हे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारी झालेल्या मोठ्या विक्रीमुळे भारतीय इक्विटी इंडेक्स सलग दुसऱ्या सत्रात घसरले. इस्रायल आणि इराणमधील तणावाचा गुंतवणूकदारांच्या जोखमीच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
Share Market Today
Share Market TodaySakal

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी झालेल्या मोठ्या विक्रीमुळे भारतीय इक्विटी इंडेक्स सलग दुसऱ्या सत्रात घसरले. इस्रायल आणि इराणमधील तणावाचा गुंतवणूकदारांच्या जोखमीच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. आता देशांतर्गत गुंतवणूकदार मार्च तिमाही निकालांवर बारीक नजर ठेवतील.

ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 845.12 अंकांनी अर्थात 1.14 टक्क्यांनी घसरून 73,399.78 वर बंद झाला आणि निफ्टी 246.90 अंकांनी म्हणजेच 1.10 टक्क्यांनी घसरून 22,272.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक धक्क्यांमुळे जगभरातील बाजारांची भावना बिघडल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. भारतीय बाजारांनीही आठवड्याची सुरुवात घसरणीने केली आहे. सोमवारी दिवसभरात सावरण्याचा प्रयत्न झाला पण बेअर्सने आपली पकड घट्ट केली आणि इंडेक्स खाली खेचला.

व्यवहाराच्या अखेरीस निफ्टी 246.90 अंकांच्या घसरणीसह 22,272.50 वर बंद झाला. दिवसअखेर सर्व क्षेत्र लाल रंगात बंद झाले. मीडिया आणि पीएसयू बँकांनी सर्वात वाईट कामगिरी केली.

Share Market Today
Bhavesh Bhandari: कोण आहेत भावेश भंडारी? संन्यासी बनण्यासाठी केला 200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग

निफ्टी 50 च्या तुलनेत मिड आणि स्मॉल कॅपमध्ये अधिक करेक्शन झाले. ते 1.57 टक्के आणि 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बियरीश कँडल तयार करून, या इंडेक्सने त्यांचा पूर्वीचा सपोर्ट तोडला आणि तो खाली बंद झाला. निफ्टी 22,185 च्या सपोर्टवरून पुनरागमन करू शकेल असे आदित्य यांचे म्हणणे आहे. तर वरच्या बाजूला 22,430 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • विप्रो (WIPRO)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

Share Market Today
Tesla Layoff: इलॉन मस्कचा धक्कादायक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com