
Adani Ports shares fall: ईरान आणि इज्रायलमधील युद्धसदृश परिस्थितीचा फटका उद्योगपती गौतम अदानी यांना बसला आहे. त्यांच्या अदानी पोर्ट्स या कंपनीचे शेअर मागील 10 दिवसांमध्ये तब्बल 10 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे अदानी यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 10 हजार कोटी रुपयांनी त्यांची नेटवर्थ घसरली आहे.