

Nifty IT Plunges as American Tech Shock Triggers Massive Sell-Off
eSakal
Infosys Stock Crash : आज सकाळपासून शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात TCS, Infosys आणि Wipro या शेअर्समध्ये तब्बल 6 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारातील टेक शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील वाढत्या चिंतेमुळे भारतीय आयटी शेअर्सवरही दबाव आला आहे.