
जेन स्ट्रीटने 4,844 कोटी रुपये एस्क्रोमध्ये जमा केले त्यानंतर सेबीने बंदी मागे घेतली.
शेअर बाजारातील हेराफेरीच्या आरोपांमुळे कंपनीवर पूर्वी कारवाई झाली होती आणि NSE टर्नओव्हर 35% ने कमी झाला होता.
सेबीने परत ट्रेडिंगला परवानगी दिली पण प्रत्येक हालचालीवर काटेकोर नजर ठेवण्याचा इशारा दिला आहे.
Jane Street to Resume Trading: अमेरिकेतील ट्रेडिंग दिग्गज कंपनी जेन स्ट्रीटने पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात एन्ट्री केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने या न्यूयॉर्कस्थित कंपनीला 4,844 कोटी रुपये एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा केल्यानंतर ट्रेडिंगसाठी परवानगी दिली आहे.
ही रक्कम 'अनधिकृत नफा' म्हणून गोठवण्याचा आदेश सेबीने दिला होता. अखेर बंदी हटवली असली तरी सेबीने कंपनीला ई-मेलद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.