Mukesh Ambani Jio Financial Services Listing
Mukesh Ambani Jio Financial Services ListingSakal

Jio Financial Services: प्रतीक्षा संपली! Jio Fin ची बाजारात एंट्री, BSE वर 'या' किंमतीपासून केली सुरूवात

Jio Financial Services Listing: शेअर्सच्या लिस्टिंगची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस मोठा आहे.

Jio Financial Services Listing: रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्ज झालेली Jio Financial Services Limited आज स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली आहे. Jio Financial Services Limited चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 265 रुपये प्रति शेअर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर 262 रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध आहेत.

Jio Financial Services Limited (JSFL) शेअर्सच्या लिस्टिंगची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस मोठा आहे.

शेअर्स प्री-ओपनिंगमध्ये किती रुपयांवर स्थिरावले

जेएसएफएलचा शेअर बीएसईवर शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये 265 रुपये प्रति शेअरवर स्थिरावला होता. त्याच वेळी, जेएसएफएलचा शेअर प्री-ओपनिंगमध्ये एनएसईवर 262 रुपये प्रति शेअरवर सेटल झाला.

Mukesh Ambani Jio Financial Services Listing
Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल ...

मार्केट तज्ञ अनिल सिंघवी म्हणाले की, जिओ फायनान्समधील दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये राहण्याचा सल्ला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांनी स्टॉकवर रु. 250 चा स्टॉपलॉस ठेवावा.

ते म्हणाले की, कंपनीची एकूण संपत्ती 1.17 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शिअलमध्ये रिलायन्सचा 6.1% हिस्सा 1.05 लाख कोटी रुपयांचा आहे. त्याचे मूल्य 185 रुपये आहे.

अनिल सिंघवींनी सांगितले की, कंपनीकडे भरपूर भांडवल आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर व्यवसायात उतरण्याची शक्यता आहे. नकारात्मकबाब म्हणजे याक्षणी कोणताही महत्त्वपूर्ण व्यवसाय नाही.

Mukesh Ambani Jio Financial Services Listing
म्युच्युअल फंड : उद्दिष्टपूर्तीचा राजमार्ग

लिस्टिंगनंतर काय?

  • शेअर 10 दिवसांपर्यंत ट्रेड टू ट्रेडमध्ये राहील

  • 3 दिवसांनंतर सर्व इंडेक्समधून बाहेर पडेल

  • जर 2 दिवस सर्किट असेल तर बाहेर जाण्याचा मार्ग आणखी 3 दिवस वाढवला जाईल.

  • Jio Financial ही दुसरी सर्वात मोठी NBFC असेल

जिओ फायनान्शियलचे सुमारे 635 कोटी शेअर्स एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले होते. 20 जुलै रोजी शेअरची किंमत 261.8 रुपये होती. त्याची मार्केट कॅप सुमारे 1.66 लाख कोटी रुपये आहे.

या संदर्भात, RIL ची कंपनी बजाज फायनान्स नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी NBFC असेल. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 4.15 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिमर्जरची तारीख 20 जुलै होती.

Mukesh Ambani Jio Financial Services Listing
Mera Bill Mera Adhikar: खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल अपलोड करुन मिळवा 1 कोटी, ही आहे सरकारची नवी योजना

जिओ वित्तीय सेवा व्यवसाय

RIL च्या वित्तीय सेवा कंपनीकडे ब्रोकिंग, AMC, NBFC, विमा आणि म्युच्युअल फंड यांचा परवाना आहे. जिओ फायनान्शिअलचे 6 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.

या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज (RIIHL), रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ पेमेंट्स बँक, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लि. यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com